सावंतवाडीत २४ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा

सावंतवाडी । प्रतिनिधी : रोटरी क्लब सावंतवाडी आणि मुक्ताई ॲकेडमी यांच्या संयुक्त विदयमाने सावंतवाडीत विदयार्थी – विदयार्थिनींसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २० वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे उदघाटन श्री पंचम खेमराज महाविदयालयाच्या सभागृहात सकाळी ९ वाजता करण्यात येईल.
पुढील तीन गटात स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.

२० वर्षाखालील खुला गट
प्रथम रु.१ हजार चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय
रु.७५० व चषक, प्रशस्तीपत्र
तर तृतीय रुपये ५०० चषक व प्रशस्तीपत्र

१३ वर्षाखालील गट
प्रथम रु.७५०, चषक, प्रशस्तीपत्र
द्वितिय रु.५००, चषक, प्रशस्तीपत्र तर तृतीय रु.२५०, चषक, प्रशस्तीपत्र

९ वर्षाखालील गट
प्रथम रु.७५०, चषक, प्रशस्तीपत्र द्वितीय रु.५००, चषक, प्रशस्तीपत्र तर
तृतीय रु.२५०, चषक, प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रवेश फी रुपये ५० घेण्यात येईल.स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, जन्मतारीख, ठीकाण आणि आधारकार्ड (आबा कशाळीकर – ९४२२०५४९४८) या मोबाईल क्रमांकावर वाॅट्स ॲपद्वारे शनिवार २३ डिसेंबर सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाठवायचे आहे. राष्ट्रीय बुदधिबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात येईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.