रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचा वधुवर मेळावा उत्साहात 

आबलोली :रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ (संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा) व जिल्हा वधुवर मंडळ यांच्या वतीने आयोजित वधुवर पालक परिचय मेळावा शुभगंधा मंगल कार्यालय लोवले(ता.संगमेश्वर) येथे उत्साही वातावरणात पार पडला.

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन,छत्रपती शिवाजी महाराज आणि संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार करुन स्वागत करण्यात आले.यानंतर जिल्हा वधुवर मंडळाचे अध्यक्ष संतोष पावसकर यांनी प्रास्तविक केले.व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते वधुवर पालक परिचय पुस्तिका व संगमेश्वर तालुक्याची दिनदर्शिका यांचे प्रकाशन करण्यात आले.यानंतर दिपक राऊत,विनोद झगडे,लक्ष्मण तेली,राम पडगे,डाॕ.दिलीप पाखरे,सुनिल चौधरी यांनी मेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व वधुवर,पालक आणि समाज बंधुभगिनींना शुभेच्छा देताना बहुमोल मार्गदर्शन केले.

आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य व म.प्रां.तै.महासभा महासचिव भूषण कर्डीले यांनी तेली समाजाच्या प्राचीन काळ ते आजच्या स्थितीवर मार्गदर्शन करताना उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.कोकण विभागाचे अध्यक्ष सतीश वैरागी यांनी दिलेला ११०००/रुपये देणगीचा चेक महासचिवांनी अध्यक्षांच्या हाती सुपुर्त केला.अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार यांनी १ आॕक्टोबर २०२३ ला सुरु झालेला वधुवर पालक परिचय मेळाव्याचा प्रवास आज इथे येवढ्या भव्यदिव्य वातावरणात पोहोचला आहे याचा मनापासून आनंद झाला आहे असे आवर्जून सांगितले.यासाठी सर्व जिल्हापदाधिकारी,वधुवर मंडळाचे सर्व सदस्य,सर्व तालुक्यांचे पदाधिकारी, यजमान म्हणून संगमेश्वर तालुका व विशेष सहकार्य म्हणून रत्नागिरी तालुक्यातील पदाधिकारी,सर्व महीला आघाडी युवक आघाडी या सर्वांचे व्यासपीठावरुन जाहीर आभार मानले.त्याचप्रमाणे समाजबंधुभगिनींची उपस्थिती व उत्साह पाहुन रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ भक्कम होत आहे असे सांगत समाधान व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष संताजी पतसंस्थेचे संचालक,आमचे मार्गदर्शक श्री. विनायक राऊत सर,सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष श्री.लक्ष्मण तेली,माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती श्री. विनोद झगडे,महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सहसचिव श्री.जयेश बागडे,राज्य समन्वयक श्री.सुनिल चौधरी,महासचिव श्री.भूषण कर्डीले सर,जिल्हाध्यक्ष श्री.रघुविर शेलार,कार्याध्यक्ष श्री.दिपक राऊत,सातारा जिल्हाध्यक्ष श्री.राम पडगे,जिल्हा वधुवर मंडळ अध्यक्ष श्री.संतोष पावसकर,सातारा जिल्हाध्यक्ष श्री.संजय शेडगे,सुत्रसंचालक दिनेश नाचणकर,जिल्हा सचिव श्री.संदीप पवार,तालुकाध्यक्ष सर्व श्री.प्रकाश झगडे,प्रकाश लांजेकर,सचिन लांजेकर,श्रीकृष्ण (बापू)राऊत,विद्याधर राणे,जिल्हा संघटक राजेश झगडे,डाॕ.दिलीप पाखरे,उद्योजक श्री.गणपतशेठ रहाटे,श्री.सुभाषशेठ रहाटे,सामाजिक कार्य कर्ते श्री.अमोल साळुंखे,विश्वेश्वर पतपेढीचे संचालक कमलाकर शेलार,विश्वेशर पतपेढी संचालिका व मुंबई विभाग अध्यक्षा सौ.रोहीणी महाडीक,कोकण विभाग अध्यक्षा सौ.प्रियंका भोपळकर,जिल्हाध्यक्षा सौ श्रेया महाडीक, तालुकाध्यक्षा श्रीमती पद्माताई विभूते,कार्याध्यक्ष श्री.गणेश धोत्रे, श्री.संदीप पवार (देवरुख)इत्यादी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमचे सर्वांचे मार्गदर्शक विजय पुनसकर,मनोहर रहाटे,दिलीप रहाटे,संदीप रहाटे,हरीश्चंद्र (बाबू) चव्हाण,ओमकार चव्हाण,संतोष रहाटे,दिपक सकपाळ,प्रमोद भडकमकर,अमोल लांजेकर,निलेश कोतवडेकर,रुपेश शेलार,सचिन (बबलू)कोतवडेकर, सौ.संध्या नाचणकर,अजय नाचणकर,रमेश रहाटे,अमित रहाटे,शामकर्ण भोपळकर,हरिश्चंद्र पवार,देवरुख व संगमेश्वर येथील सर्व महीला भगिनी आणि समाज बांधवानी आतिशय मेहनत घेतली.तसेच अनेक समाज बांधवांनी शुभेच्छा रुपी जाहीरात देऊन सहकार्य केले,तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आणि हा कार्यक्रम दिमाखदार पध्दतीने यशस्वी केला त्या सर्वांचे मनापासून आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या मेळाव्याचे औचित्य साधत समाजातील बांधवाना लाभ घेता यावा म्हणून विश्वेश्वर पतपेढी मर्यादित कोकण विभाग यांच्या वतीने प्रचार आणि प्रसार होण्यासाठी स्टाॕल लावण्यात आला होता.