तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्रशाळा आचरे नं१ शाळेचे घवघवीत यश

आचरा | अर्जुन बापर्डेकर : तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार या स्पर्धेत केंद्रशाळा आचरे नं.१ ने घवघवीत यश संपादन केले आहे. यात २०० मी धावणे मोठा गट मुली १)कु वेदांगी नरेश पुजारे – द्वितीय लांब उडी मोठा गट-मुली १)कु हर्षल नवनाथ भोळे- द्वितीय रिले सांघिक खेळ ५०×४ मुलगे- लहान गट प्रथम , रिले सांघिक ५०×४ मुली- लहान गटप्रथम, रिले सांघिक १००×४ मुली- मोठा गट-प्रथम , कबड्डी लहान गट-सांघिक मुलगे – उपविजेता , कबड्डी लहान गट-सांघिक मुली – विजेता
विजेत्यांचे शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, शिक्षक माने यांसह सर्व पालक शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.