गुहागर तालुका गुरव प्रीमिअर लीगचा रंगणार उद्यापासून थरार

तळवली (वार्ताहर ) हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर तालुका (रजि.)यांच्यावतीने गुरव प्रीमियर लीग चे तिसरे पर्व चे आयोजन 30 व 31 डीसें.2023 गतवर्षाला बाय बाय व नवीन वर्षाचे स्वागत करणे साठी वेळंब नाळेवाडी या मैदानावर करण्यात आलेले असून तालुक्यातील बारा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत गुरव समाजातील तरुण 150 ते 200 खेळाडू आपला खेळ दाखवणार असून तालुक्यातील गुरव समाज बहुसंख्येने येथे जमणार आहे

गुहागर तालुका गुरव प्रीमियर लीगचे मागील दोन पर्व यशस्वीरित्या पार पडल्यानंतर तिसरे परवाचे समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे,समाज एकजूट करणे, समाजाचे सभासद वाढविणे, तरुण पिढीला समाजाविषयी आदर निर्माण व्हावा असे समाज हिताचे विषय या लीगमधून होणार आहेत
या स्पर्धेसाठी प्रथम रोख पारितोषिक मा. श्री मंगेशजी रांगळे भा.ज.पा. तालुका उपाध्यक्ष गुहागर यांनी 15000/-, द्वितीय रोख पारितोषिक श्री सचिनजी बाईत शिवसेना तालुकाप्रमुख गुहागर यांनी 10000/-, प्रथम क्रमांक चषक -श्री भूषण गुरव, द्वितीय चषक – श्री प्रमोद आरोलकर, सामनावीर व मेडल -सौ आर्या मोरे सरपंच हेदवी, मालिकावीर फलंदाज गोलंदाज – सौ निशा गुरव ( कांदिवली ) महिला उपशाखा संघटक शिवसेना, मालिकावीर फलंदाज गोलंदाज साठी टी-शर्ट – अजिंक्य गुरव (वेळंब ), सन्मान चिन्ह – महाडिक बंधू, स्पर्धेसाठी चेंडू – शोयब मालाणी, मालिकावीर साठी बॅट – श्री प्रसादजी संसारे, दोन दिवस जेवण व्यवस्था – गुरव समाज वेळंबगट, युट्युब लाईव्ह – गुरव क्रीडाप्रेमी खेळाडू अशाप्रकारे स्पर्धेचे आयोजन नियोजन करण्यात आलेले असून यास्पर्धेसाठी हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर तालुका श्री मंगेश मोरे व कार्यकारणी यांच्या वतीने सदर स्पर्धेसाठी तालुक्यातील बहुसंख्य समाज बंधू भगिनीं नी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.