भूमापनी करण्यास टाळा टाळ
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत किंजळे तर्फे नातू या ठिकाणी बी एस एन एल चा टॉवर मंजूर झालेला आहे हा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी कधी नव्हे ते बीएसएनएल ने तत्परता दाखवली आहे मात्र टॉवर साठी लागणारी जागा मोजून देण्यासाठी येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडून खोडा घालण्याचे काम सुरू असल्याने या टॉवरचे काम सद्य स्थितीत रेंगाळले आहे
खेड तालुक्यातील किंजळे तर्फे नातू हा भाग दुर्गम भाग म्हणून ओळखला जात आहे या ठिकाणी पायाभूत सेवा सुविधांचा अभाव आहे त्यात गेली अनेक वर्षे हा भाग मोबाईल सेवे पासून वंचीत राहिला असल्याने येथील ग्रामस्थ आज ही संपर्कहीन आहेत या मुळे डिजिटल युगात या परिसराला संपर्कात आणण्यासाठी जल फाउंडेशन चे अध्यक्ष नितिन जाधव प्रयत्नशील आहेत वारंवार संबधीत यंत्रने शी संपर्क साधून देखील गेले दिड वर्षाहून अधिक काळ हा प्रश्न जैसे थे आहे
बी एस एन एल चा टॉवर साठी लागणारी जागा ग्रामपंचायत च्या आवारात मंजूर करण्यात येऊन त्या ठिकाणी टॉवर उभा राहणार आहे मात्र या जागेची मोजणी झाल्यावरच टॉवरच्या कामाला सुरुवात होणार आहे मात्र भूमि अभिलेख कार्यालय या कामी उदासीन असल्याचे दिसून येत असल्याने या कामाचा चांगलाच खोळंबा झाला आहे
मागील काही दिवसापासून या अधिकाऱ्यांच्या संपर्कात नितीन जाधव हे स्वता आहेत परंतु अधिकाऱ्यांकडे वेळ नसल्यामुळे थोडा उशीर होत असल्याची बाब पुढे आली आहे










