सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचा वधु-वर मेळावा रविवार ७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी आरपीडी हायस्कूलच्या ‘नवरंग कलामंच हॉल ‘ येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा वधु-वर मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात एकाच छताखाली वधु-वरांना प्रत्यक्ष पाहण्याची व परिचय करून घेण्याची संधी भंडारी समाज मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी मेहेनत घेत असून वेगवेगळ्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सावंतवाडी तालुका भंडारी भवन कार्यालय- ८२७५११६११७ येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे.












