रत्नागिरी : सोमवारी मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र दणादण उडवून दिली. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर राजापूर येथे पाऊस पडत होता तर रत्नागिरी शहर आणि परिसरात मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
याचा थेट फटका आंब्याच्या मोहोरावर झाला. अनेक ठिकाणी मोहोर गळून पडल्याचे वृत्त हाती येत आहे. गतवर्षी पुरेसा आंबा झालं नव्हता त्यामुळे बागायतदार उत्पादक हैराण झालं होता. यावेळी थन्डी चांगली पडल्याने अनेक ठिकाणी मोहोर चांगला फुलला होता. मात्र मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी मोहोर गळल्याचे वृत्त आहे याचा फटका किती बसतो ते लवकरच स्पष्ट होणार आहे.












