खेड शहरातील खड्डयांमुळे मनस्ताप

खेड (प्रतिनिधी) नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालक, पादचारी त्रस्त झाले आहेत. नगरप्रशासन खड्डे बुजवण्याबाबत दुर्लक्ष करत ठेकेदाराची पाठराखण करत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वीच आमदार योगेश कदम यांच्या पुढाकारातून बडे हॉस्पिटलसमोर, बसस्थानकामागील सुपरमार्केट कातळ आळी येथील  रस्ते दर्जेदार झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र कचरा डेपो परिसर, मराठा भवन, संत रोहिदास नगर, शिवतररोड मार्ग, डाकबंगला, पोलीस उपविभागीय कार्यालय, सोनारआळी, गुजराआळी, कुंभारवाडा परिसरातील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे आहे. नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने रहदारीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे नगरप्रशासनाने अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.