प्रत्येकाच्या सहभागातून व्यापारी मेळावा यशस्वी करूया!

व्यापाऱ्यांच्या एकजुटीचे व ताकदीचेही दर्शन घडवूया : व्यापारी मेळावा नियोजन बैठकीत मालवणातील व्यापाऱ्यांचा निर्धार 

मालवण | प्रतिनिधी : मालवणात होणारा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा व्यापारी एकता मेळावा प्रबोधन, व्यापार-उद्योग वाढ बाबत मार्गदर्शन, तरुण व्यापाऱ्यांना प्रोत्साहन अशी अनेक उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने होत आहे. प्रत्येक व्यापाऱ्यासाठी हा घरचा कार्यक्रम असणार आहे. प्रत्येकाच्या सहभागातून हा मेळावा यशस्वी करूया, व्यापाऱ्यांच्या एकजुटीचे व ताकदीचे दर्शन घडवूया. असे आवाहन मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी मालवण व्यापारी संघाच्या बैठकीत केले.

 

मालवण व्यापारी संघाचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा यावर्षीचा व्यापारी एकता मेळावा मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर ३१ जानेवारी रोजी होत आहे. यजमान असलेल्या मालवण व्यापारी संघातर्फे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून त्यां दृष्टीने मालवण व्यापारी संघाची बैठक मालवण शहर येथील लिलांजली सभागृहात संपन्न झाली.

 

मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा व्यापारी संघांचे कार्यवाह नितीन वाळके, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, रवी तळाशीलकर, हर्षल बांदेकर, विजय केनवडेकर, अभय कदम, महेश अंधारी, सरदार ताजर, दिपक पाटकर, सुशांत तायशेटे, अभि परब, सौगंधराज बादेकर, पूनम चव्हाण, प्रभाकर देऊलकर, सुमित कवटकर, राजू सावंत, करण खडपे, गणेश प्रभुलकर, भाऊ सापळे, बाळू तारी, सुहास ओरसकर, पूजा वाडकर, रिया बांदेकर, वैशाली शंकरदास, स्वप्नाली नेरुरकर, नीलिमा आरोलकर, संजीवनी कुडाळकर, प्रसाद धारगळकर, आनंद पारकर, बाबाजी बांदेकर, पंकज पेडणेकर, हेमंत शिरपूटे, दिनेश मुंबरकर, हेमंत शिरगावकर, अमरजीत वनकुद्रे, वेदिका केनवडेकर, राधिका मोंडकर, परशुराम पाटकर, अरविंद सराफ, दशरथ कवटकर, दिलीप बिरमोळे प्रफुल्ल देसाई व इतर उपस्थित होते.

 

यावेळी विजय केनवडेकर यांनी व्यापारी मेळाव्याच्या रूपरेषेबद्दल माहिती दिली. २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सागरी महामार्ग ते बोर्डिंग ग्राउंड अशी व्यापाऱ्यांची स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर बोर्डिंग ग्राउंड येथील विविध स्टॉलचे उदघाटन होणार आहे. रात्री साडे सात वाजल्यापासून माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. नागरिकांसाठी हा कार्यक्रम खुला असणार आहे.

 

३० रोजी सायंकाळी ६ वाजता तरुण व्यापारी व उद्योजकांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्र होणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सदर होणार आहेत. हा ही कार्यक्रम सर्वांसाठी असणार आहे.

 

३१ रोजी मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री, खासदार, आमदार यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुरस्कार वितरण, ज्येष्ठ व्यापारी सत्कार व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती विजय केनवडेकर यांनी दिली.

 

यावेळी मार्गदर्शन करताना नितीन वाळके यांनी मेळाव्यात व्यापाऱ्यांचा सहभाग, जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. व्यापारी मेळावा सुरळीत पार पाडण्यासाठी सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. मेळाव्यात व्यापाऱ्यांसाठी प्रबोधनावर जोर देण्यात येणार आहे, असे सांगत सर्व व्यापाऱ्यांनी मिळून हा मेळावा यशस्वी करूया. असे नितीन वाळके यांनी सांगितले. यावेळी मेळावा आयोजन व नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या.