खेड न्यायालयातर्फे विविध विषयावर माहिती शिबीर

खेड(प्रतिनिधी) खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश – १ डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनानुसार आय सी एस  कॉलेज खोंडे येथील सभागृहामध्ये राष्ट्रीय युवा दिवस व अटकपूर्व अटक आणि रिमांड टप्प्यावर न्याय मिळवण्यासाठी लवकर प्रवेश या दोन विषयांवर मार्गदर्शन शिबीर घेण्यात  आले.
या वेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश खेड श्री.पी.एस.चांदगुडे यांनी एखादया व्यक्तीला संशयीत म्हणून अटक करायची असेल तर त्याच्या घरातील व्यक्तीला प्रथम त्याची माहिती दयावी लागते तसेच त्याला कोणत्या गुन्हयामध्ये अटक केली हे जाणण्याचा अधिकार असतो व त्याला मोफत विधी सेवा मार्फत कायदेशिर सल्ला मिळण्याचा अधिकार असून हा अधिकार अटकपूर्व,अटक व ट्रायल या तिन्हीसाठी लागू राहिल याबद्दल मार्गदर्शन केले
तसेच सह दिवाणी न्यायाधीश व स्तर खेड श्री. एम. व्ही. तोकले यांनी स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक युवकांचे आयुष्य हे मनोरंजक असून आपल्या वाईट वेळेतून चांगले घ्यायचे हे स्वतःच्याच हातात असते असे सांगितले. प्रत्येक युवकांनी तरुण वयात स्वामी विवेकानंद यांच्याबददल जितके वाचता येईल तितके वाचावे याबददल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास तदर्थ जिल्हा न्यायाधीश खेड श्री.पी.एस.चांदगुडे, सह दिवाणी न्यायाधीश व स्तर खेड श्री. एम. व्ही तोकले तसेच कॉलेजचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आय सी एस  कॉलेज खोंडे  येथील मुख्याध्यापिका सौ. आवटे तसेच तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी श्रीमती के. एम. साळवी, श्री. एस. के. जोशी, श्री. एस. एम. गायकवाड, श्री.जी.पी. राठोड यांनी अधीक्षक सौ.एस. आर. रेमणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.