श्री रामेश्वर विद्यालय कोंडगे येथे प्रजासत्ताक दिन संपन्न

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोंडगेयेथील श्री रामेश्वर विद्यालय कोंडगे येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते
या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी किरण सामंत यांची कन्या अपूर्वा सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती . अध्यक्षस्थानी सौ आर्या अमोल कदम होत्या. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एकनाथ विश्वासराव, सरचिटणीस नरेश चव्हाण, कार्याध्यक्ष जे.पी. जाधव, विजय चव्हाण, एकनाथ चव्हाण, विलास सदाशिव चव्हाण, सुधाकर दत्ताराम बेर्डे, चंद्रकांत हनुमंत काटकर ,सूर्यकांत कदम बाळकृष्ण गुरव, महेश कदम, विवेकानंद विश्वासराव मंगेश कदम,खजिनदार रमाकांत कदम, स्थानिक चिटणीस श्रीधर विश्वासराव ,महेश विश्वासराव, स्थानिक अध्यक्ष दशरथ विश्वासराव.सरपंच डॉ.एस व्ही कदम ,कमलेश चव्हाण, चेअरमन एस के जाधव मुख्याध्यापक आर् एन पवार, दीपक कदम राजन गुजर व तिन्ही गावातील सरपंच व बहुसंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा जाधव यांनी केले