बहुजन समाज पार्टी हा संविधानावर चालणारा पक्ष -पी.के.चौकेकर

चौके | प्रतिनिधी : देशात अनेक राजकीय पक्ष आहेत निवडणुका जवळ आल्या की आंबेडकरी समाज आठवतो सत्ता स्थानी बसल्यानंतर संविधानाच्या विरोधी कारभार केला जातो मात्र बहुजन समाज पार्टी देशात भारतीय संविधानानुसार चालणारा पक्ष आहे.फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे असे प्रतिपादन बसपा जिल्हाध्यक्ष पी.के. चौकेकर यांनी कार्यकर्ता प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना केले .बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यांमध्ये विधानसभावाईज कार्यकर्ता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ विधानसभा मतदारसंघातील चौके येथे कार्यकर्ता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .

कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गास प्रशिक्षक म्हणून जिल्हा प्रभारी सुधाकर माणगावकर यांनी मार्गदर्शन करताना बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा ,पक्षाचे उद्दिष्ट, ध्येयधोरणे कार्यकर्त्याची जबाबदारी कर्तव्य याबाबत विस्तृत माहिती देऊन देशातील जाती जातीत विभागलेल्या समाजाला एकत्र करून समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विधानसभा अध्यक्ष विजय साळकर यांनी केले यावेळी विधानसभा उपाध्यक्ष दुलाजी चौकेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सेक्टर अध्यक्ष अनंत बाबाजी चौकेकर उपाध्यक्ष अनंत महादेव चौकेकर बामसेफ जिल्हा संयोजक एस जी विणकर , नामदेव चौकेकर, कृष्णा श. चौकेकर, दादू चौकेकर, समीर चौकेकर, बाबुराव चौकेकर आदी बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.