वाफोली संकीर्ण रस्त्यासाठी १० लाखांचा निधी प्राप्त

माजी सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

बांदा (प्रतिनिधी) :     वाफोली संकीर्ण ग्रामीण मार्ग ८८ या मार्गाच्या डांबरीकरणासाठी जिल्हा नियोजन मधून १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर झाल्याचे उपसरपंच विनेश गवस यांनी सांगितले.

 

यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, माजी सरपंच मारूती गवस, शिवाजी गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, वाफोली सोसायटी चेअरमन धनश्री गवस, व्हाइस चेअरमन अनिल गवस, ग्रा. पं. सदस्य साक्षी शिरोडकर, मंजुळा शेगडे, उल्हासिनी गवस, राजेंद्र सिताराम गवस, अजय गवस, प्रदीप आयकर, जयदेव गवस, बबन आना गवस, विठ्ठल गवस, चंद्रकांत आईर, मंगेश सावंत, रामदास गवस, उदय गवस, सखाराम गवस, राजन गवस, संजय गवस, राजेश गवस, विधी गवस, वैभवी देसाई, दशरथ आईर, सद्गुरू आईर, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर आदी उपस्थित होते.

 

यावेळी वाफोली ग्रामपंचायत वतीने प्रमोद कामत यांचा माजी सरपंच शिवाजी गवस, मारुती गवस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाफोली गावातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. आपला सेवक म्हणून केव्हाही हाक द्या, असे आवाहन प्रमोद कामत यांनी केले. उपस्थितांचे आभार विनेश गवस यांनी मानले.