पीरलोटे नजीक देशी विदेशी मद्य जप्त; एकावर गुन्हा

खेड | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गा वरील पिरलोटे स्टॉपजवळ धामणदेवी हद्दीत देशी विदेशी मद्य विकणाऱ्या एकास अटक करून सुमारे ४ हजार ५०० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. ही कारवाई ३० जानेवारी रोजी रात्री ७.५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन श्रीराम कडु (वय ४३ वर्षे रा पिरलोटे दत्तवाडी ता खेड) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे.  पिरलोटे स्टॉपजवळ धामणदेवी हद्दीत आरोपी हा गैरकायदा बिगरपरवाना देशी विदेशी दारु आपले ताबे कब्जात विक्रीसाठी बाळगले स्थितीत मिळुन आला मिळाला. त्याच्याकडून  २,८००- रुपये किंमतीचे देशी दारु जी. एम. एक नंबर संत्रा सिलबंद ४० बाटल्या, ९०० रूपये किंमतीच्या इंग्रजीत रॉयल स्टँग डिलक्स व्हीस्की असे लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या एकुण ०५ दारुने भरलेल्या काचेच्या सिलबंद बाटल्या, ८०० रुपये किंमतीच्या इंग्रजीत इंम्पेरीयल ब्ल्यू व्हीस्की असे लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या ०५ दारुने भरलेल्या काचेच्या सिलबंद बाटल्या एकुण ४५०० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.