नमो चषक वक्तृत्व व बास्केटबॉल स्पर्धेचे मालवणात उदघाटन

भाजप युवा मोर्चाचे आयोजन : दोन्ही स्पर्धेला स्पर्धाकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमित खोत | मालवण : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग आयोजित नमो चषक अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा तसेच बास्केटबॉल स्पर्धेचा उदघाटन सोहळा रविवारी मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालय तसेच टोपीवाला हायस्कुल पाटांगण येथे संपन्न झाला. स्पर्धेला संपर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सिंधुदुर्ग कॉलेज प्रभारी प्राचार्य कैलास राबते, माजी नगरसेवक दीपक पाटकर, अशोक तोडणकर, बबलु राऊत, संघ संचालक आबा हडकर, नंदू देसाई, राजू बिडये, भाजप युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर, शुभम सकपाळ, निनाद बादेकर, पंकज गावडे, मालवण शहर सरचिटणीस निषय पालेकर, मयु पारकर, पार्थ वाडकर, ताराचंद पाटकर, अरविंद सावंत, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, राज कांदळकर, जयेश चिंचाळकर, गौरव लाड, प्रसाद चव्हाण यासह अन्य पदाधिकारी तसेच वक्तृत्व स्पर्धा परीक्षक महेश धामापूरकर, वर्षा अभ्यंकर व बास्केटबॉल परीक्षक अमु हर्डीकर, अमेय बादेकर यासह स्पर्धक उपस्थित होते.

यावेळी सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, बाबा परब यांनी विचार मांडले. युवकांना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे यासाठी भाजप युवा मोर्चा माध्यमातून खेलो इंडिया यासह विविध व्यासपीठ निर्माण केली. ही स्पर्धा ही त्यातीलच एक आश्वासक व्यासपीठ स्वरूपात आयोजित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेत देश वेगाने प्रगती करत असताना देशाचे भविष्य असलेल्या युवा शक्तीला अधिक बळ देण्यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हण, भाजप नेते निलेश राणे तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. असे यावेळी सांगण्यात आले. तर बास्केटबॉल खेळाची निवड या स्पर्धेत विशेष स्वरूपात करण्यात आली. मालवण येथील हे बास्केटबॉल मैदान उभारणीसाठी भाजप नेते निलेश राणे यांनी भरीव निधी दिला असल्याची आठवण बाबा परब यांनी या निमित्ताने सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण व जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर यांनी केले.

18 फेब्रुवारीला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नमो चषक अंतर्गत आयोजित मालवणातील विविध स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 18 फेब्रुवारीला मामा वरेरकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती युवा मोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण यांनी दिली.