राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीमध्ये महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश

रत्नागिरी | प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. दिपिका कोतवडेकर यांच्या उपस्थीतीमध्ये मध्ये अनेक महिला कार्यकर्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

 त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव झुबेरभाई काझी यांच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव भागातील सौ. नबीला रफीक बोदले, सौ. रेशमा झुबेर काझी, सौ. शबाना अहमद आंबेडकर यांनी महीला सौ. नबिला रफिक बोदले यांची महिला तालुका उपाध्यक्ष पदी सौ. रेशमा झुबेर काझी यांची शिरगाव पंचायत समिती गण पदी नेमणूक लवकरच करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सौ. दिपिकाताई कोतवडेकर यांनी सांगितले. सौ. नबिला बोदले आणि सौ. शबाना आंबेडकर यांचे तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे समाजकार्य सुरु असून त्यांच्या माध्यमातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष संघटन मजबुत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सागितले आणि लवकरच आणखी महीला मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करतील याचे आश्वासन दिले आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये लवकरच अल्पसंख्याक विभाग पक्ष संघटनाचे काम जोमाने करेल असे श्री. झुबेरभाई काझी यांनी सांगितले.

महीला जिल्हा सचिव सौ. कल्पनाताई भिसे यांच्या माध्यमातून सौ. छायाताई पवार आणि सौ. सुषमा कासेरकर यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला त्यावेळी पक्ष संघटन वाढीसाठी आमच्याकडून चांगल्याप्रकारे सहकार्य लाभेल असे त्यांनी सांगितले. सौ. अलिया मजगावकर यांच्या प्रयत्नाने सौ. नबिला मुल्ला, सौ. सराह बोरकर यांनी पक्ष प्रवेश केला. कार्याध्यक्षा सौ. मनहा मुल्ला यांच्या संघटन कौशल्याने सौ. नविदा मुल्ला, सौ. झिनत गांगु, सौ. आयेशा टेमकर, सौ. प्रीती पाटील, सौ. तुलसी माने आदी. महिलांनी मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केला. महिलांच्या आजच्या प्रवेश कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन सर्वतोपरी मदत केली जाईल असे तालुकाध्यक्ष श्री. राजन सुर्वे यांनी सांगितले.

राष्ट्रवादि काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्यातील महीला सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून लवकरच नविन धोरण आखले जाईल असे श्री. कुमारजी शेटे आणि श्री. बशिरभाई मुर्तुझा यांनी सांगितले. रत्नागिरी तालुक्यामध्ये महिलांसाठी लागणारे सहकार्य युवकांच्या माध्यमातुन उभे करण्यात येईल असे युवक जिल्हाध्यक्ष श्री. नौसीन काझी आणि विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. संकेत कदम यांनी सांगितले.