रेकोबा वायरी संघ उपविजेता
17 फेब्रुवारीला मामा वरेरकर नाट्यगृह येथे नमो चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण
अमित खोत | मालवण :
भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग यांच्या वतीने टोपीवाला बोर्डिंग मैदान मालवण येथे आयोजित नमो चषक क्रिकेट स्पर्धेत माणगाव (कुडाळ) संघ विजेता ठरला. तर रेकोबा वायरी (मालवण) संघ उपविजेता ठरला.
गुरुवारी स्पर्धेचा अंतिम सामना रंगादार पद्धतीने संपन्न झाला. माणगाव संघाने थरारकपणे विजय मिळवला. स्पर्धेत मालिकावीर म्हणून विशाल लुडबे, उत्कृष्ट फलंदाज सोनु कानडे, गोलंदाज राज तोडणकर, क्षेत्ररक्षक संदीप नार्वेकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सुमित सावंत, ललित चाव्हण, निखिल घोगळे, सुशील गावडे, मकरंद सावंत, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, स्वरूप वाळके, तेजस म्हाडगुत, मांजरेकर, राजू परब यांसह भाजप, युवामोर्चा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 17 फेब्रुवारी रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे पारितोषिक वितरण होणार आहेत. अशी माहिती स्पर्धा संयोजक सुमित सावंत यांनी दिली.











