कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे महिला मेळावा उत्साहात साजरा

 

रत्नागिरी : कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे महिलांनकरिता हळदीकुंकू .व स्मरण शक्ती व उखाणेस्पर्धा .घेण्यातआल्या. कार्यक्रमांचे अध्यक्षा श्रावणी प बोरसे वाहतूक नियंत्रण प्रज्ञेश बोरसे यांच्या सोभाग्यवती यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास उत्साहाने सुरूवात. वक्त्या भारती सोळंकी शिक्षिका , यांनी आपल्या सणांचे महत्व धार्मिक व भौगोलिक पध्दतीने मांडले प्रमुख पाहुणे मिनल खैर सांप्रदायिक व सामाजिक कार्यकर्त्या, गायली पवार रा. प. म. मंडळ अधिकारी व कामगार महिला ,कामगार कुटुंबियांनी आपली उपस्थिती मोठ्या संख्येने लावून सहकार्यकेले.पाहुण्यांचे सर्व महिलांचे हळदी कुंकू ,वाण, गुलाब देऊन स्वागत , पाहुण्यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . मंडळाच्या योजना उपक्रम माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे मनपूर्वक कौतुक पाहुण्यांनी केले. व शुभेच्छा दिल्या. खेळीमेळीने कार्यक्रम संपन्न झाला. पाहुण्यांचे स्वागत व आभार संस्कृती शिंदे केंद्र प्रमुख यांनी मानले .