रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील थिबापॅलेस येथील विवाहिता औषधे आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती परत आली नाही. ही घटना गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वा.वाजण्याच्या सुमारास थिबापॅलेस येथे घडली. या प्रकरणी तिच्या पतीने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
राखीया साहिद शेख (३०, रा. सुरभी अपार्टमेंट, थिबापॅलेस, रत्नागिरी) असे घरातून निघून गेलेल्या विवाहितेचे नाव आहे. राखीया ही किरकोळ आजारी होती औषधे आणण्यासाठी बाहेर जाते असे सांगून ती गुरुवारी सायंकाळी घरातून निघून गेली. बराच वेळ झाला तरीही ती परत आली नाही. म्हणून तिच्या पतीने आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला असता तिचा कोठेही पत्ता लागला नाही. म्हणून तिच्या पतीने तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.











