सावंतवाडी । प्रतिनिधी : घे भरारी फाउंडेशन तर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिवस याचे औचित्य साधून सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा भोसले उद्यान सावंतवाडी येथे घेण्यात आली. यामध्ये दुर्गा गौतम सरनाईक यांनी २८९ सूर्यनमस्कार घालून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच मीना विठ्ठल पिंगुळकर यांनी २३५ सूर्यनमस्कार घालून द्वितीय क्रमांक पटकाविला. तर सुप्रिया संजय मुधाळे यांनी २०२ सूर्यनमस्कार घालून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच ज्योती दुधवडकर, वंदना मडगावकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस व गोल्ड मेडल देण्यात आली.
यावेळी घे भरारी अध्यक्षा मोहिनी मडगावकर, उपाध्यक्ष रिया रेडीज, खजिनदार शारदा गुरव, रेखा कुमठेकर ,साक्षी परुळेकर सुश्मिता नाईक, सीमा रेडीज, वैष्णवी बांदेकर, उमा चोडणकर आदि उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे निवेदन व आभार मेघना राऊळ यांनी केले.











