कुपेरी : रस्त्यावर पडलेले झाड स्वतः तोडून बाबा परब यांनी रस्ता केला मोकळा

 

अमित खोत | मालवण : कसाल मालवण मुख्य मार्गांवर कुपेरी घाटी येथे बुधवारी दुपारी झाड पडल्याने रस्ता बंद झाला. याच वेळी या मार्गवरून मालवणच्या दिशेने प्रवास करत असलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी बाजूच्या घरातील घरातील ग्रामस्थांकडून कोयता घेऊन स्वतः झाड तोडून रस्ता मोकळा केला. बाबा परब यांच्या कार्यतत्परते बाबत अन्य वाहनचालक व उपस्थितानी कौतुक करत आभार मानले.