खेड(प्रतिनिधी) आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोटे शिवसेना-युवासेना व युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन काते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय शाळा लोटेमाळ येथे १५ पंखे देण्यात आले.
रजिम बँकेचे संचालक सुरेश कांबळे, हिंदवी गर्जना इंग्लिश स्कूलचे संस्थापकीय संचालक सचिन आंब्रे, शिवसेना सचिव सागर महाडिक, घाणेखुंट शाखाप्रमुख सचिन गवळी, उपविभागप्रमुख रोहन कालेकर, युवासेना उपतालुका अधिकारी सुरज मोगरे, आदिल मिठागरी, शुभम कदम, ओंकार चिले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुजर, नवनाथ पालांडे, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका तसेच पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुर्वे यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. सुरेश कांबळे यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला. सचिन गवळी, सचिन आंब्रे यांनीही मनोगते व्यक्त केली










