एका शेतकऱ्याच्या काजू कलमांचे मोठे नुकसान
राजापूर l प्रतिनिधी : राजापूर तालुक्यात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भितीचे वातावरण पसरले असतानाच आता तालुक्याच्या पुर्व परीसरात गव्या रेडयांचाही उपद्रव सुरु झाला आहे . दोन दिवसांपुर्वी परुळे येथे गवा रेड्याने एका शेतकऱ्याच्या बागेतील सुमारे चाळीस ते पन्नास काजूच्या झाडांचे आतोनात नुकसान केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोकाट सुटलेल्या या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे .
गेले काही महिने बिबट्याची दहशत सर्वत्र सुरु असतानाच आता गवा रेड्याचा देखील उपद्रव सुरु झाला आहे .तालुक्याच्या पुर्व परीसरात परुळे गावचे ग्रामस्थ मनोहर विनायक सावंत, यांच्या काजूच्या बागेत घुसुन गवा रेड्याने त्यांची सुमारे .४० ते ५० फळे देणाऱ्या काजूच्या झाडांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे त्यामध्ये मनोहर सावंत यांचे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे . वनविभागाच्या वतीने नुकसानग्रस्त बागेची पहाणी करण्यात आली .दरम्यान तालुक्यात वन्य श्वापदांचा उपद्रव वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता जनतेतुन होवू लागली आहे .











