खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील शिव फाटा येथील शंभूराजे युवा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त बोरज-शिवफाटा येथे आयोजित जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत खेडच्या ओमसाई ग्रुपने विजेतेपद पटकावले.
आवाशीच्या रूई ग्रुपने द्वितीय तर खेडच्या ओ.एस. ग्रुपला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यास ५ हजार रूपये, उपविजेत्यांस ३ हजार रूपये, तृतीय क्रमांकास २ हजार रूपये व चषक देवून गौरवण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांनाही सन्मानचिन्ह देण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शंभूराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीन घोसाळकर, कार्याध्यक्ष शिवलिंग जंगम, महेश मर्चंडे, सनी चव्हाण, हर्षदीप उदेग, रोनित इनरकर, रोहन इनरकर, रमाकांत बंदरकर, ऋतिक साळवी, सुयश घोसाळकर, कृतिक घोसाळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.










