खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील देवघर येथील ७ आदिवासी कुटुंबियांना प्रधानमंत्री जनजाती घरकुल योजनेतून घरकुले मंजूर झाली होती. या घरकुलांचे बांधकामही पूर्ण झाल्याने येथील गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या हस्ते लाभार्थ्यांकडे घरकुलांच्या चाव्या देवून ताबा देण्यात आला. ग्रामविस्तार अधिकारी दीपक कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने ७ आदिवासी कुटुंबियांसाठी घरकुले मंजूर झाली होती.
या घरकुलांचे बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध होताच घरकुले बांधण्याचे काम हाती घेण्यात आली. ही कामे पूर्णत्वास झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याकडे ताबा सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी सरपंच सुनील मोरे, विस्तार अधिकारी खांडगे, पाटील, गावडे, ग्रामविस्तार अधिकारी दीपक कदम, ग्रामपंचायत सदस्या मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.











