ऋत्विक सामंत यांची शिवसेना युवासेना मालवण-कुडाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

मिहीर मकरंद राणे यांची युवासेना मालवण तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना युवासेना मालवण-कुडाळ जिल्हाध्यक्ष पदी मालवण येथील ऋत्विक जगदीश सामंत तर युवासेना मालवण तालुकाध्यक्ष पदी मिहीर मकरंद राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदाधिकारी नियुक्ती नंतर सोशल मीडियात शिवसेना नेते किरण (भैया) सामंत यांच्या सोबत ऋत्विक, मिहीर यांचे अभिनंदन बॅनर व्हायरल होत आहेत.

 

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्हयातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. युवा सेना मध्यवर्ती कार्यालय येथून युवासेना सचिव किरण साळी, दीपेश म्हात्रे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे नियुक्ती जाहीर झाली आहे. अशी माहिती शिवसेना माजी सचिव पक्ष निरीक्षक किसन मांजरेकर यांनी दिली.