विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

मंडणगड | प्रतिनिधी : विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन अर्थात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस सहा. प्रा. मंगेश ठसाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सहा. प्रा. अरुण ढंग यांनी यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांमधून अंश तांबे व सर्वेश निवरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य पवार तर आभारप्रदर्शन अर्पिता बोरकर हिने केले. महाविद्यालयातील शिक्षक प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.