बजरंग दलाचे बजरंगी आणि श्री शिवप्रतिष्ठानच्या सदस्यांचा माचाळ मार्गे लांजापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
लांजा | प्रतिनिधी : भल्या पहाटेच चार वाजता माचाळ मार्गे खडतर प्रवास करत लांजा येतील बजरंग दलाचे बजरंगी आणि श्री शिवप्रतिष्ठानचे २२ मावळ्यांनी अनवाणी विशाळगडावरुन लांजा येथे आणलेल्या शिवज्योतीचे लांजा येथे जंगी स्वागत करण्यात आले.लांजा येतील बजरंग दलाचे बजरंगी आणि श्री शिवप्रतिष्ठानचे धारकर्यांनी विशाळगडाहुन शिवज्योत आणण्यासाठी भल्या पहाटेच चार वाजता लांजा येथून प्रयाण केले.सगळे मावळे माचाळ मार्गे खडतर प्रवास करत आठ वाजता विशाळगड येथे दाखल झाले. त्यानंतर सगळ्या मावळ्यांनी गडावरील असणाऱ्या तीन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आणि तेथून शिवज्योत घेऊन पुन्हा एकदा माचाळ मार्गे केळवली येथे आले.केळवली येथे उपसरपंच पांडुरंग साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सर्व मावळ्यांचे आणि शिवज्योतीचे स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. या ठिकाणी सर्व मावळ्यांना अल्पोपहार देण्यात आला.यानंतर सर्व मावळे गोवीळ- वाडगाव मार्गे लांजा येथे दाखल झाले.
लांजा येथील बसवेश्वर चौकामध्ये सर्व मावळ्यांचे आनंदी भोजनालयाचे मालक तुळसणकर दांपत्याने पाद्य पूजा करून औक्षण व जंगी स्वागत केले.यानंतर शिवज्योत लांजा येथील राम मंदिर मध्ये नेण्यात आली. त्या ठिकाणी पुन्हा एकदा लांजा वासियांच्या तर्फे औक्षण करण्यात आले ,पूजा करण्यात आली आणि त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला.या सर्व मोहिमेसाठी लांजातील २२ मावळे सहभागी झाले होते. सर्व मावळ्यांनी अनवाणीच शिवज्योत आणली. रणरणत्या उन्हात देखील शिवज्योत विशाळगड ते लांजा यशस्वीपणे घेऊन आले.











