भारतीय महीलांचे कायदेशीर अधिकार या विषयावर व्हिक्टर डांन्टस लाँ काँलेज, कुडाळच्या प्राध्यापिका अँडव्होकेट वेदिका नाखरे व प्राध्यापिका अँडव्होकेट शांभवी तेंडोलकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थीनी व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. महिलांसाठी भारतीय कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत याची प्राथमिक माहिती ऊदाहरणांसह देऊन तरूण तरूणींना याबाबत जागरूक असण का गरजेच आहे या विषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन केल. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. अनिश गांगल, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या महिला विकास मंचातर्फे , मंच्याच्या अध्यक्षा प्राध्यापिका सौ. प्राजक्ता राणे व विद्यार्थीनी संयोजिका कु. योगीता लोके यांनी पुढाकार घेऊन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन संगणक विभागाची विद्यार्थीनी कु. सानिका सरदेसाई व मेकँनिकल विभागाची विद्यार्थीनी कु. सुकन्या गावकर यांनी केले.












