खेड (प्रतिनिधी) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेंतर्गत तालुका आरोग्य विभागातर्फे ३ मार्च रोजी ० ते ५ वयोगटातील ८१६८ बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
तालुक्यात ८ प्रा. आरोग्य केंद्र व १ नगरपरिषद दवाखाना कार्यक्षेत्रात ८१६८ लाभार्थ्यांसाठी २३२ बुथ तैनात केले जाणार आहेत. यासाठी लस जिल्हास्तरावरून उपलब्ध झाली आहे. ० ते ५ वयोगटातील एकही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून ४ ते ८ मार्च या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून लसीकरण करणार आहेत.
आयआयपीची १७१, १३ मोबाईल व ३ ट्रान्सिट पथकांची नियुक्ती केली आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, भरणे येथेही पथके तैनात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक समिती बैठक पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी यशवंत भांड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पवार, विस्तार अधिकारी नरेश इदाते उपस्थित होते.












