पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला मंडणगड मध्ये उस्फूर्त प्रतिसाद 

मंडणगड l प्रतिनीधी:पोलिओ आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रविवारी मंडणगड तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील जवळपास २०० पेक्षा जास्त बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

 

पोलिओ निर्मूलनाच्या ध्येयपूर्तीसाठी १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओची लस पाजण्यात येत आहे. यासोबतच या मोहिमेतून सुटलेल्या बालकांना ग्रामीण आणि शहरी भागात विशेष लसीकरण मोहीम राबवून लस पाजण्यात येत आहे.

 

लसीकरण मोहीम राबविताना संपूर्ण तालुक्यातील

एकाही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. म्हणून विशेष मोहिम हाती घेतली होती.