आबलोली l वार्ताहर :उद्योग विभागाच्या काथ्या धोरण २०१८ अंतर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ व्दारा पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी,काथ्या पासून बनविण्यात येणा-या विविध आकर्षक व उपयुक्त उत्पादनांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे
काथ्या दोरीच्या विविध आकर्षक पायपुसण्या गार्डन आर्टिकल, कोकोपीट पासून खत निर्मिती,जिओ टेक्सटाईल,प्लोअरमेंट आदी.सदर निवासी प्रशिक्षण केंद्रीय काथ्या प्रशिक्षण व संशोधन संस्था,कॉयर बोर्ड,आलेप्पी केरळ येथे देण्यात येणार असून हे प्रशिक्षण पूर्ण मोफत आहे या १० दिवशीय प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींची निवास , प्रवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे
तरी रत्नागिरी जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील, किमान इयत्ता १० वी पास व उद्योग करु इच्छिणाऱ्या महिला – पुरुष यांनी अधिक माहितीसाठी श्री.रमेश जाधव प्रकल्प अधिकारी,एम सी ई डी व्दारा जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी (मो.नं.९४०४५०००४) यांचेशी संपर्क साधावा असे जाहीर आवाहन प्रशिद्धी पत्रकाव्दारे श्री.राजेश कांदळगावकर, विभाग प्रमुख,एम सी ई डी यांनी केले आहे










