महसूल विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

लांजा (प्रतिनिधी) महसूल विभागाच्या पासविना ओव्हरलोड खडी वाहतूक करणारे डंपर आज रविवारी ३ मार्च रोजी सायंकाळी ५ च्पा सुमारास
पालु तिठ्यावर तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे व ग्रामस्थांनी रोखून धरले यावेळी त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे खडी वाहतूकीचे पास नसल्याने महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पालू येथून भांबेड दाभोळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक सुरू आहे आणि ही वाहतूक ओव्हरलोड होत आहे. या ओव्हरलोड डंपर मधून मोठ्या प्रमाणात खडी देखील रस्त्यावर पडून दुचाकीसारख्या छोट्या वाहनांचे अपघात होत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप काँग्रेस तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर आज रविवारी 3 मार्च रोजी सायंकाळी पालू तिठा येथे अशाप्रकारे ओव्हरलोड खडी वाहतूक करणारे डंपर ग्रामस्थांनी रोखून धरले 28 टना ऐवजी 38 वर इतकी ओव्हरलोड खडी डंपरमध्ये भरलेली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आणि आज दिवसभरात अशा प्रकारे ओव्हरलोड खडी वाहतूक करणारे 25 डंपर गेल्याचे गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना त्याकडे महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष झाल्याबद्दल काँग्रेस तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान या डंपर वाहतूक रोखल्यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये,
भाजपाचे पदाधिकारी संजय आयरे, तसेच ग्रामस्थ सुरेश नावे, श्याम गाडे, सुरेश गाडे , राजाराम सावंत आदिंसह कोर्ले, पालु आदी भागातील अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. आणि महसूल विभागाने अशा ओव्हरलोड खडी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.











