मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानां मध्ये तालूका स्तरावर तिसे शिगवणवाडी शाळा प्रथम 

 

 

खेड(प्रतिनिधी)मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानां मध्ये तालूका स्तरावर तिसे शिगवणवाडी शाळे ने प्रथम

प्रथम क्रमांक प्राप्त केला याबद्दल तिसे शिगवणवाडी शाळेचा सत्कार करण्यात आला

 

तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थित मान्यवर शिक्षण विस्तार अधिकारी श्री बाईत व उपस्थित केंद्रप्रमुखांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममता भोसले व सहकारी शिक्षक व‌ विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

 

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री देवेंद्र जाधव ,सौ.संपदा टाकळे ,.संतोष मोरे व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली तसेच शाळेत उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थी बचत बँक,बालवाचनालय शिष्यवृत्ती परीक्षा यांसारख्या स्पर्धा परीक्षा बाबत शाळेची कामगिरी विषयी माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक .संतोष रा. मोरे यांनी केले.