कै. दीपक जानकर स्मृती चषक लांजा क्रिकेट स्टार ने पटकावला.

 

 

जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा नारकर मैदानावर संपन्न 

 

लांजा (प्रतिनिधी) लांजा येथील लांजा क्रिकेट स्टार क्लब च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत लांजा क्रिकेट स्टारने कै. दीपक जानकर स्मृती चषकासह विजेतेपद पटकावले.

लांजा क्रिकेट स्टार चा सुपरस्टार खेळाडू कै. दीपक जानकर यांचे काही दिवसापूर्वी अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ लांजा क्रिकेट स्टार क्लब ने जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा लांजाच्या नारकर मैदानावरती आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये राजापूर, रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली, गुहागर मधील अनेक शिक्षक आपले संघ घेऊन सहभागी झाले होते.

या स्पर्धेमधील अटीतटीच्या अंतिम सामन्यात लांजा क्रिकेट स्टार संघाने विजेतेपद पटकावले तर संघर्ष इलेव्हन खेड संघ उपविजेता ठरला. बेस्ट बॉलर म्हणून लांजा स्टारचे दिनेश झोरे यांनी तर बेस्ट बॅट्समन संघर्ष खेड चे गणेश सानप ठरले. स्पर्धेचा मालिकावीर ‘किताब लांजा स्टार चा उमेश जाधव यांची निवड झाली

या स्पर्धेचे उद्घाटन कै. दीपक जानकर यांचे वडील व नातेवाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर बक्षीस वितरण समारंभ प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक अंकुश चांगण, संतोष कांबळे व राजेंद्र चांदिवडे , जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष प्रदीप मडवी, शिक्षक समिती सरचिटणीस दिनेश झोरे व माजी चेअरमन विलास जाधव यांच्या उपस्थितीत पार पडले.

ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी लांजा क्रिकेट स्टार संघातील सर्व खेळाडूंनी मेहनत घेतली.