किरकोळ करणारं एकाला तिघांनी केली दगड आणि लाकडाने मारहाण

कोकण नगर येथील घटना

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील कोकणनगर येथे किरकोळ कारणातून एकाला तिज्ञांनी मिळून दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बुधवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वा.सुमारास घडली.
शैनाज समीर सोलकर,समीर सोलकर आणि साहिल समिर सोलकर (तिन्ही रा.शेट्येनगर,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अब्दुल मतिन हसनमियाँ डोंगरकर (38,रा.कोकणनगर ग्रीनपार्क झोपडपट्टी,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादीच्या घराशेजारी संशयिताच्या घराचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी फिर्यादी हा आपल्या घराबाहेर पायरीवर चहा पित बसलेला होता. त्यावेळी तिन्ही संशयित त्याठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीला आमच्या घराचे काम करण्यासाठी सामान येणार आहे, तुझी कार बाजुला कर असे सांगितले. त्यावर फिर्यादीने त्यांना माझी कार बाजुलाच आहे,तुम्ही तुमचे काम करा असे सांगितले.
त्यावर संशयित साहिल सोलकरने बाजूचा दगड उचलून
फिर्यादीला शिवीगाळ करत तुझी गाडी बाजूला कर नाहीतर,फोडून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर संशयित शैनाज सोलकर हिनेही हातात दगड घेतला तर समीर सोलकरने बाजुला पडलेला लाकडी दांडका हातात घेतला. या तिघांनिही फिर्यादीला गाडी बाजूला कर नाहीतर फोडून टाकू असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करत त्याच्या कंबर,हातावर दगड व लाकडी दांडका मारुन दुखापत केली. फिर्यादीवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.