राजे ग्रुप मंडणगड यांच्यावातीने शहरात पालखी महोत्सवाचे आयोजन. 

 

मंडणगड l प्रतिनिधी : शिमगोत्सवाचे औचीत्यसाधून 24 मार्च 2024 रोजी राजे ग्रुप मंडणगड यांच्यावातीने सलग दहाव्या वर्षी शहरातील परकार कॉम्पलेक्स समोरील मैदानात पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ठिक ठिकाणचे खेळी व पालख्या व नागरीकांनी या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला. तालुक्यातील 9 गावांतील ग्रामदैवतांच्या पालख्यांनी महोत्सवास भेट देत पालखी नृत्य सादर केले. याचबरोबर म्हाप्रळ कुंभार्ली येथील गोमुचे नाच या नृत्यपथकाने आपली कला सादर केली. अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या नियोजनाने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. कार्यक्रमास दुधेरे बामणघर ग्रांमपंचायत सदस्य सौ. मनाली दळवी, गटविकास अधिकारी विशाल जाधव, दुधेरे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष मदन दळवी, दिलीप दळवी, संदीप मोरे, कौस्तुभ जोशी, वकिल यश घोसाळकर, संतोष जाधव, भिकु खेडेकर, संतोष पवार, प्रविण फणसे, सतिश महाडीक, राकेश वाजे यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.