माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गांवात शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.
होळी पौर्णिमेला माड आणून,माड उभा केला जातो. गावचा होम लागतो.होम लागल्यावर श्री वाघजाई देवीची पालखी वाजत गाजत नाचवत ग्रामदेवतेच्या मंदिरातून सहन पायरी येथे आणली जाते.सहाणपायरी वर होमा वाटल्या पाच प्रदक्षिणा घातल्या जातात.मग पालखी मारुती मंदिरात भेटीसाठी जाते.पुन्हा सहाण पायरी येथे आल्यावर पालखी नाचवण्यात् येते.
दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पालखी नाचवण्याचा सोहळा होतो.यावेळी जत्रा भरते.परिसरातून भाविक मोठ्या संख्येने पालखी नाचवण्यासाठी उपस्थित असतात.त्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी बैठी असते.नन्तर माना प्रमाणे पालखी गाव भोवणीला फिरते.आंबव पोंक्षे गावात २ एप्रिल रोजी रात्री शिंपणे होणार आहे.गावाचा एकोपा राखणारा शिमगोत्सव मोठया दिमाखात साजरा होतो.












