मी लोकप्रतिनिधी म्हणून अनेक पदे भूषविली या सर्व काळामध्ये केवळ सिंधुदुर्गच्या विकासाचा विचार केला आत्ता केंद्रीय मंत्री असतानाही कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प उभे केले दोडामार्ग येथील बाराशे एकर एमआयडीसी मध्ये 500 विविध प्रकारचे कारखाने निर्माण होत आहेत वेगवेगळी क्लस्टर व अनेक लघु उद्योगांना चालना दिली .

हा विकास मी घडवत असताना विद्यमान खासदारांनी विरोधाशिवाय कोणतेही काम केलेले नाही उद्धव ठाकरे भ्रष्टाचारी नेता असून कोरोनातही कमिशन खाणे सोडले नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवगड येथे केली. यावेळी विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले

देवगड येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या तालुक्यामध्ये 91 हजार मतदाते असून त्यातली 90000 मते आपल्याला मिळाली पाहिजेत असे नियोजन करा असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला.
सिंधुदुर्ग मध्ये शिक्षणाची सोय केली मेडिकल कॉलेज आणली इंजिनिअरिंग कॉलेज आणले अनेक उद्योग आणले मध संकलन प्रकल्प तसेच कुंभार कामासाठी असणारी विविध यंत्र देण्याचा प्रकल्प असो असे कित्येक प्रकल्प लोकांना उपलब्ध करून दिले आहेत.
केवळ विरोध करणे हे सध्याच्या विद्यमान खासदाराचे काम आहे . केंद्र सरकारने खासदार म्हणून दिलेल्या निधीही त्यांना खर्च करता येत नाही हे दुर्दैव असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले
देशाचा विकास हे मोदीच करू शकतात आज अशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे देश प्रगतीपथावर जात आहे मोदींचे नेतृत्व बळकट करण्यासाठी आपण या भागातून आपला खासदार निवडून देऊ असे आवाहन आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार अजित गोगटे, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे प्रकाश राणे, बाळ खडपे, योगेश चांदोसकर दयानंद पाटील योगेश पाटकर शरद ठूकरुल, अमित साटम यांच्यासह अनेक असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
आमदार नितेश राणे यांनी यावेळी आपल्या भाषणात तालुक्याच्या विकासाचा आढावा घेतला देवगड तालुक्यामध्ये सर्वत्र भाजपच आहे प्रत्येक गावात कोट्यावधीची कामे मंजूर झाली आहेत. विरोधकांकडे विरोधाशिवाय दुसरे मुद्दे नाहीत. सध्या सिडको चा मुद्दा विरोधासाठी वापरत आहेत मात्र हे खरे नाही ज्यावेळी कोकणच्या कोणत्याही अहिताचा विषय असेल त्यावेळी राणे कुटुंबीय जागृत राहून त्याला विरोध करतील केंद्रीय मंत्री व आपले नेते नारायण राणे कोकणच्या विकासाबाबत कोणतीही घटना घडू देणार नाहीत असे आमदार नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले
मी देवगड तालुका माझे कुटुंबीय मानतो देवगड तालुक्यातील जनता मला अतिशय जवळची आणि प्रिय असून येथील महायुतीच्या विजयात या जनतेचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला
राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे यांनी स्वतः अजित पवार उभे आहेत असे गृहीत धरूनच आम्ही काम करणार आहोत असा शब्द उपस्थितांना दिला
यावेळी बोलताना डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी कोकणचा विकास घडवणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याला देवगडच्या जनतेला मतदान करण्याची प्रथम संधी मिळणार असल्याचा उल्लेख केला
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी आमदार अजित गोगटे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले











