सात्विनगाव येथे २८ रोजी मोफत दिव्यांग शिबीर

खेड (प्रतिनिधी) पुणे येथील भारत विकास परिषद विकलांग केंद्राच्या वतीने २८ एप्रिल रोजी सात्विनगाव-लवेलनजीक लोटे परशुराम नवीन औद्योगिक वसाहतीत मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय व हात देण्यात येणार असून कॅलिपर शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. पुणे येथील स्कॉन प्रो फाऊंडेशन, पुणे रोटरी क्लब ऑफ स्क्रॉन प्रो. रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ ते १ यावेळेत आयोजित शिबिरात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.