मिशन ग्रंथालय 2024 अंतर्गत कर्ले जिल्हा परिषद शाळेला ‘ कपाटाची’ भेट

विविध दात्यांच्या माध्यमातून ‘ मिधन ग्रंथालय 2024 ‘ अंतर्गत कर्ले जिल्हा परिषद मराठी शाळेला पुस्तके ठेवण्यासाठी एक कपाट भेटवस्तू म्हणून देण्यात आले.
याची संकल्पना कर्ले येथील ग्रामस्थ आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते श्री. वरुण लिमये यांच्या माध्यमातून साकारण्यात आली.
इयत्ता सातवीच्या मुलांसाठी शुभेच्छा समारंभ आयोजित कार्यक्रमा दरम्यान शाळेसाठी देणगी स्वरुपात मिळालेल्या ग्रंथालय कपाटाचा शाळेला अर्पण करण्याची सोहळा पार पडला.
ग्रामपंचायत सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. श्री. मिलिंद हातफले, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा. सौ. वेदिका हातफले तसेच पोलिस पाटील मा. श्री. उदय लिमये यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला.

यावेळी मुख्याध्यापक श्री.नितीन गावकर यांनी कपाटासाठी बहुमूल्य देणगी देणार्‍या कल्याण येथील महेश लिमये,अविनाश ओक आणि पुणे येथील CA श्रिया लिमये, गौरी वैशंपायन, CA वरद पटवर्धन, शीतल वाघमारे, भाग्यश्री पटवर्धन या दात्यांचा तसेच त्यासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या मा. श्री. वरुण लिमये यांचा उल्लेख करत आभार व्यक्त केले. सहकार्य करणार्‍या सर्वांप्रती कृतज्ञता म्हणून याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात गावातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वी शाळेला एका संस्थेच्या माध्यमातून संगणक देण्यात आला होता.आता शाळेच्या कपाटासोबतच ग्रंथालयाची पूर्तता करण्यासाठी तसेच शाळा डिजिटल,शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन श्री.वरुण लिमये यांनी केले आहे