भाजपला 44 वर्षांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा मिळाली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पाठविण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी मतदार राहतील! 

किरण सामंतां घेतलेल्या निर्णयाचा आदर म्हणूनच त्यांच्या पाठीशी महायुतीची ताकद असेल.  

 भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा विश्वास! 

 सिंधुनगरी l प्रतिनिधी :  भाजपाच्या स्थापनेपासून मागील 44 वर्षात पहिल्यांदाच महायुतीतून लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळाली आहे. व केंद्रीय मंत्री नारायण राणे या लोकसभेचे उमेदवार म्हणून एन डी ए च्या राष्ट्रीय समितीने निवड जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षासाठी ही आनंददायी घटना आहे. महायुतीतील घटक पक्षामधून केंद्रीय मंत्री नारायण राणे अडीच लाख मताधिक्याने निवडून येतील व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्याना पाठविण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार मतदार त्यांच्या पाठीशी राहतील असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आधी सर्वच महायुतीच्या नेत्यांचे आपण जाहीर आभार व्यक्त करत असल्याचे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधील अनुभवी नेतृत्व म्हणून नारायण राणे यांना उमेदवार म्हणून पक्षाने जाहीर केलं,त्यामुळे महायुती या मतदार संघामध्ये सर्वात जास्त नारायण राणेंना अडीच लाखाच्या मताधिक्य देईल तसे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीचे नेते नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, ना.दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सुरुवात झाली आणि संपूर्ण मतदारसंघांमध्ये त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, रविंद्र चव्हाण,दिपक केसरकर, आमदार नितेश राणे ,निलेश राणे,राजन तेली यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये केलैल्या विकास कामामुळे, मोदींच्या योजनांमुळे व भाजप नेते प्रमोद जठार,अतुल काळसेकर यांच्या संघटनात्मक कामामुळे अपेक्षित असं मताधिक्य राणेंना मिळेल असा विश्वास आहे. प्रथमच कमळ निशानीवर खासदार या मतदारसंघातून विजयी होऊन पुन्हा एकदा मंत्रिमंडळात विराजमान होतील. असा विश्वास आहे.

 

रत्नागिरी येथे उद्या शुक्रवारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पन्नास हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यतुन 25000 कार्यकर्ते व महायुतीचे पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. .24 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा रत्नागिरी येथे तर त्यांनतर केंद्रीय उद्योग मंत्री नितीन गडकरीं यांची सभा सिंधुदुर्ग मध्ये होण्याचं नियोजन आहे.

 

किरण सामंत यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर.

 

शिवसेना पक्षातून उमेदवारीसाठी आग्रही असणारे आमचे मित्र किरण सामंत यांच्याही मागणीचा आणि त्यांनी आज घेतलेल्या चांगल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. भविष्यात त्यांच्या मागे महायुतीची सर्व ताकद उभी करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महायुतीतील घटक पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष व त्यांचे सर्व नेते यांचे चांगले सहकार्य असून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.