सावंतवाडी । प्रतिनिधी : ज्ञानसिंधू प्रबोधिनी सावंतवाडीच्या वतीने दि.13 एप्रिल ते 17 एप्रिल असे एकूण 5 दिवस मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर राबविण्यात आले होते.या शिबीरात संपूर्ण जिल्ह्यातून 5 दिवसात 42 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. सदर शिबीराला मैदानी विषयात वनरक्षक प्रकाश रणगिरे तर लेखी विषयात तलाठी प्रवीण पोले व ज्ञानसिंधू प्रबोधिनीच्या इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रबोधिनीच्या वतीने पोलीस भरतीचे एक-एक पुस्तक मोफत देण्यात आले.तसेच प्रबोधिनीची पोलीस भरती बॅच-2024 दिनांक 22 एप्रिल पासून सुरू होत आहे,या बॅचसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन ज्ञानसिंधू प्रबोधिनी सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले आले.*











