वनविभागाने पकडून सोडले नैसार्गिक अधिवासात
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडा काळेवाडी येथील नारायण काळे यांच्या माड बागायतीतील विहिरीमध्ये भली मोठी मगर आढळून आली. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मगरीला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
सावंतवाडी वन क्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक रमेश पाटील, वन कर्मचारी बबन रेडकर, वैशाली वागमारे यांनी मगरीला सुरक्षित रित्या पकडली. या कामत स्थानिक ग्रामस्थ रेडकर, धुरी, सपकाळ, मोर्य, बुगडे व दळवी यांनी त्यांना मदत केली.
Sindhudurg