नेरके येथे ८ मे रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील श्री ब्राह्मणदेव क्रिकेट संघ नेरकेवाडी यांच्या वतीने नेरकेवाडी सडा येथे दि. 8 मे रोजी मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

 

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघासाठी रोख 15,000/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास 10,000/- व आकर्षक चषक, तृतीय विजेत्यास 2,000/- व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांक विजेत्यास 2,000/- व आकर्षक चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

 

या शिवाय उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर अशी वैयक्तीक पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी रुपेश शिवगण : 7977215197, अविनाश राघव : 8291013532, भाऊ मोहिते : 9021743585 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बी. सी. सी. नेरकेवाडी आणि मुंबई मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.

——————————————————————————————