खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील खोपी–अवकिरेवाडी, मानेवाडी येथील ग्रामस्थांचा टँकरच्या पाण्यासाठी पहिला अर्ज येथील प्रशासनाकडे दाखल झाला होता. याच ठिकाणी तालुक्यातील पहिला टँकर धावण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, दीड महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेतच आहेत. विशेषत: दोन्ही वाड्यांच्या उशाला खोपी- पिंपळवाडी धरण असून देखील पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात रणरणत्या उन्हामुळे तहानलेल्या ग्रामस्थांसह प्रशासनाला आतापासूनच घाम फुटत आहे. वाढत्या तापमानामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्रोत तळ गाठत चालल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी दाही दिशाच वणवण सुरू आहे. सद्यस्थितीत तालुक्यात सहा गावातील २२ वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अपुऱ्या टँकरमुळे तहानलेल्या गाव- वाड्यांना बऱ्याचदा टँकरची प्रतीक्षाच करावी महिन्याचा कालावधी लोटूनही अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा सुरू आहे. टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे वारंवार. झिजवूनदेखील पदरी निराशा पडली आहे.
दरम्यान तालुक्यातील खोपी-अवकिरेवाडी व मानेवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी सर्वप्रथम प्रशासनाकडे धाव घेतली होती. दोन्ही गाव – वाड्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. मात्र, दीड महिना लोटून देखील निराशाच पडली आहे. या दोन्ही वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा
करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, रणरणत्या उन्हामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झालेले असताना प्रशासनाकडून कुचराई का, असा सवालही दोन्ही वाड्यातील तहानलेल्या ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने टँकरने पाणीपुरवठा करत ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.










