मुजफ्फपूर स्पेशलला १२ जूनपर्यंत मुदतवाढ

 

खेड (प्रतिनिधी) बिहारमधील बहुतांश कामगार महाराष्ट्र राज्यासह गोव्यात वास्तव्यास असल्याने गोवा -ते बिहारमधील मुजफ्फपूर जंक्शन दरम्यान १७ एप्रिलपासून वास्को- द- गामा-मुजफ्फपूर साप्ताहिक स्पेशल चालवण्यात येत आहे. गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी १२ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.

 

०७३०९/०७३१० क्रमांकाची वास्को-द-गामा – मुजफ्फपूर स्पेशल ८ मे पर्यंत तर परतीच्या प्रवासात ११ मे पर्यंत धावणार होती. स्पेशल १५ मे ते १२ जून कालावधीत दर बुधवारी धावेल. वास्को-द-गामा येथून सायं. ४ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी स. ९.४५ वाजता मुजफ्फपूर जंक्शन येथे पोहचेल. परतीत १८ मे ते १५ जून धावणारी स्पेशल मुजफ्फपूर येथून दुपारी १ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता वास्को-द-गामा येथे पोहचेल.