एप्रिल महिन्यात राबविली मोहीम
१५,१२९ विना तिकीट प्रवासी, 2,69,85,256 दंड वसूल
सिंधुनगरी l प्रतिनिधी : कोकण रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक मोहीम राबवली. एप्रिल महिन्यात राबविलेल्या या मोहिमेत तब्बल १५,१२९ विना तिकीट प्रवासी सापडले गेले. व त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईत त्यांच्याकडून 2,69,85,256 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करत आहे.येणाऱ्या काळात हि KRCL च्या संपूर्ण मार्गावर तीव्र तिकीट तपासणी मोहिम सुरू राहणार आहे.”अभिमानाने प्रवास करणार, सन्मानाने प्रवास करणार, तिकीट काढून अभिमानाने प्रवास करा असा आवाहन कोकण रेल्वे प्रशासन करत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. एप्रिल 2024 मध्ये एकूण 15,129 अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण ₹2,69,85,256/- दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वेवरील अनियमित/अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे.









