
सावंतवाडी: चराठे येथे बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला. चराठे गावठणवाडी येथील इद्रकांत रामचंद्र मसुरकर यांच्या गाईच्या वासरावर बिबट्याने हा हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्याने वासरू गतप्राण झाले असून या घटनेमुळे परीसरात घबराट पसरली आहे. बिबट्याच्या या हल्यात वासराचा मृत्यु झाल्याने इद्रकांत रामचंद्र मसुरकर यांचे मोठं नुकसान झालं असून वन विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.










