राज्याचा निकाल ९५.८१ टक्के
पुणे :
महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल जाहिर करण्यात आला. गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून १५ लाख ८०२ विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले असून यंदाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ टक्के इतकी आहे.
कोकण विभागाने ९९.०१ टक्क्यांनी बाजी मारली आहे. तुलनेने यंदा नागपूरचा निकाल हा सर्वात कमी म्हणजे ९४. ७३ टक्के लागला आहे.











